केज तालुक्यातील दुग्धजन्य पदार्थ व फळ विक्रेत्यांच्या फळांच्या तपासणीची नागरिकांची मागणी

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील लस्सी,ताक,मावा,कुल्फी,आईस्क्रीम तसेच विविध फळांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडील फळांची अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
उन्हाळ्याच्यादिवसांमध्ये लस्सी,ताक,कुल्फी व फळांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.मात्र अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत काही ठिकाणी दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक अयोग्य पद्धतीने केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच वापरले जाणारे पाणी,बर्फ,दूध व इतर साहित्याची गुणवत्ता तपासली जावी,अशीही मागणी होत आहे.
FDA विभागाने शहर व ग्रामीण भागातील किराणा दुकान विक्रेत्यां कडून नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी,तसेच परवाना, स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांची पडताळणी करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्यास नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल,असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने FDA विभागाने तातडीने विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी,अशी मागणी जोर धरत आहे.



