वाणिज्य

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड मार्फत मा. नरेंद्रजी मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्था येथे स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न

केज/प्रतिनिधी

दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड मार्फत मा. नरेंद्रजी मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्था केज येथे एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे अध्यक्ष अॕड.श्री.यु.एम. कराड सर व सचिव श्रीमती डॉ.के.एन.गित्ते – कराड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून(सेबी) तसेच सी.डी.एस.एल चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी सर यांनी उपस्थित विद्यार्थिनींना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.यात त्यांनी विद्यार्थिनींना सेबी तसेच सी डी एस एल ची कार्य प्रणाली विशद केली.

तसेच बचत व बचतीचे महत्त्व समजावून सांगितले राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या विविध योजना,डिमॅट अकाउंट, शेअर मार्केट,म्युच्युअल फंड व इतर शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले. तसेच गुंतवणूक करत असताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य श्री.के.बी.नेहरकर सर व श्री.ए.डी केदार सर यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच सूत्रसंचालन कु.चैताली मोरे व कु. राजनंदनी काळे यांनी केले.या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!