संतोष वर्मा यांना बडतर्फ करून कारवाई करा – ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

केज/प्रतिनिधी
एक उच्च पदस्थ अधिकारी जो संपूर्ण जिल्हा सांभाळताना त्या जिल्ह्यातील सर्व जाती, धर्म,पंथ यांना सांभाळून घेऊन काम करणारा असावा व तठस्थपणे न्याय देणारा असावा असे अभिप्रेत असताना जातीय द्वेष मनात ठेवून जो काम करतो तो या पदाच्या पात्रतेचा नाही त्याने एका कार्यक्रमामध्ये ब्राह्मण मुली त्याच्या पोराला दान करत नाही किंवा संबध ठेवत नाही तोपर्यंत आरक्षण चालू ठेवलं जावे असे म्हणताना त्याला घटनेचा पण विसर पडला व त्याच्या मनात असणारा ब्राह्मण द्वेष उफाळून आला .असा व्यक्ती अशा पदावर लायक नाही म्हणून त्याला कायमचे बडतर्फ करून कायदेशीर कठोर कारवाई करावी ज्यामुळे पुन्हा कोणी दुसरा अधिकारी असं कृत्य करणार नाही अशी कठोर शिक्षा करण्याची मागणी राष्ट्रपती महोदयांना केज तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देऊन केली आहे .
महसूलचे नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना निवेदन देताना श्रीनिवासकेजकर, अनंत कोकीळ,श्रीधर खोत,ऋषिकेश जोशी, शिवराज मुथळे,सचिन जोशी,धनंजय कुलकर्णी आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.



