सामाजिक

चिंचोली माळी येथील सर्वांगीण विकास, भ्रष्टाचार चौकशी, महाडीबीटी अनुदाना साठी १७ डिसेंबर रोजी अमरण उपोषण – रोहन गलांडे पाटील 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील उर्वरित अतिक्रमण काढून छत्रपती संभाजी महाराज चौक ते श्री संत नामदेव महाराज मंदिर पर्यंत रस्ता व नालीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. तसेच चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला २०१५ ते २०२५ पर्यंत जुन्या व नव्या इमारतींच्या बांधकामा साठी,पुनर्विकासासाठी किती निधी आला व किती खर्च केला यांची माहिती देण्यात यावी. तसेच चिंचोली माळी येथील ग्रामपंचायत हद्दीत येणारे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे तसेच चिंचोली माळी येथील गायरान परीसरा तील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे.

तसेच चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच महाडीबीटी अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांना द्या‌ तसेच मौजे चिंचोली माळी ता.केज.जि.बीड येथिल उपसरपंच यांनी पाणी पुरवठा विहिरी वरून स्वताची व नातेवाईकाची जमीन भिजवण्यास पाणी वापर केला असल्या बाबत चौकशी करून आजपर्यंत शासकीय योजनेचा गैरवापर केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात यावी,केज तालुक्यातील विहीर व गायगोठा,घरकुलाचे हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे, मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची हत्या करणारा एक आरोपी आणखी अटक झाली नाही त्याला अटक करण्यात यावी व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.

चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाची २००५ ते २०२५ पर्यंत सखोल चौकशी करण्यात यावी , पटसंख्येपेक्षा जास्त शिक्षक असणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्यात यावे, कर्मवीर विद्यालय १० बोर्ड परीक्षा केंद्र आहे परीक्षा केंद्रावर सुविधा उपलब्ध असतात त्या नियमानुसार आहेत काय ? याची चौकशी करण्यात यावी सुविधा नसतील परीक्षा केंद्र रद्द करण्यात यावे,संस्थेमध्ये एसटीचा व्यक्ती भरला आहे त्याची जात वैधता बोगस आहे का त्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच कर्मवीर विद्यालया तील सर्व शिक्षकांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणी करण्यात यावी शिक्षक भरती  करण्यासाठी शिक्षकांकडून संस्थाचालकांनी अंदाजित आठ नऊ लाख रुपये घेतले आहे व दंडमशाहीने शिक्षकांकडुन संस्था चालकाने तुम्ही मला पैसे दिले नाहीत असे बाॕन्ड प्रमाणपत्र लिहुन घेतले आहेत असे समजले जात आहे .तरी यांची चौकशी प्रशासनाने करण्यात यावी जर असे झाले असेल तर संस्थाचालक यांच्यावर कारवाई करण्यात अशा मागण्यासाठी दि.१७ डिसेंबर २०२५ रोजी श्री संत नामदेव महाराज सभागृह येथे अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे.

तरी मला उपोषणा दरम्यान काही झाले माझे बरेवाईट झालेतर प्रशासन केज तहसीलदार, जिल्हाधिकारी साहेब लोकप्रतिनिधी व वरील विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील अशी निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे तरी माझ्या अन्नत्याग उपोषणाची दखल प्रशासनाने घ्यावी ही नंम्र विनंती असे निवेदनाद्वारे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!