गुन्हेगारी

माहेराहून घर बांधण्या साठी १५ लाख रुपये आण म्हणून उपाशी ठेवून,विवाहितेस बाळा सह घराबाहेर हाकलले

केज/प्रतिनिधी

माहेराहून घर बांधण्या साठी १५ लाख रुपये घेवून ये म्हणुन सासरच्या मंडळींनी उपाशी ठेवून, मारहाण करून बाळासह घराबाहेर हाकलून दिल्या प्रकरणी सासू,सासऱ्या सह पती विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गून्हा नोंद झाला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दहिफळ वडमाऊली येथील शितल चा विवाह तीन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील वडजी येथील अजय रामेश्वर जाधवर यांच्या सोबत हिंदू रितिरिवाजा प्रमाणे झाला होता.

लग्नानंतर एक वर्षे सासरच्यांनी शितलला चांगले सांभाळले.परंतु पती अजय जाधवरला ऑन लाईन गेम ची सवय लागल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारांचे कर्ज झाले. त्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी सासरच्यांनी सारखाच तगादा लावल्या मुळे दिड महिन्यापूर्वीच शितलच्या आई वडिलांनी त्यांची जमीन विकून तीन लाख रुपये दिले होते. परंतु त्यानंतरही पती अजय जाधवर हा पत्नी शितलला कॉल करून खाजगी सावकारांना कॉल वर बोलण्यासाठी जबरदस्ती करीत होता, नाही बोललीस तर बाळा सह तुला जीवे मारून टाकीन म्हणुन धमकी देत होता.

माहेराहून १५ लाख रुपये घेवून घरी ये म्हणुन शीतलला उपाशी ठेवून, शिवीगाळ करून,लाथा, बुक्क्यानी मारहाण करून दि.१६ नोव्हेंबर २०२५ रोजी घराबाहेर हाकलून दिले.व शारीरिक आणि मानसिक छळ केला म्हणुन शितल अजय जाधवर रा.वडजी जि. धाराशिव ह.मू.दहिफळ वडमाऊली यांच्या फिर्यादी वरून अजय रामेश्वर जाधवर पती, रामेश्वर अर्जुन जाधवर सासरा,व रमा रामेश्वर जाधवर सासू या तिघां विरुद्ध केज पोलिसात शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करून बाळासह घरा बाहेर हाकलून दिले म्हणुन केज पोलिस ठाण्यात गून्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जमादार पल्लवी तरकसे या पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!