शैक्षणिकसांस्कृतीक

बचपन बालविद्या मंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न, चिमुकल्यांनी धरला गाण्यावर ठेका

केज/प्रतिनिधी

केज शहरातील धारूर रोडलगतच्या बचपन बाल विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन मुक्ताबाई लॉन्स मध्ये शनिवार रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले हे होते तर  प्रमुख उपस्थिती डॉ. हनुमंत सौदागर,पत्रकार रामदास तपसे,गौतम बचुटे,शरद गिराम,श्री. तिडके सर,डॉ.वसुदेव नेहरकर,डॉ.उमाकांत मुंडे,संजय कराड,शाम कराड,अँड उध्दव कराड,राख सर,बचपन बाल विद्यामंदिरचे विनायक कराड यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न झाले.

यावेळी हनुमंत भोसले म्हणाले की,पालकांनी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करावे.केजचा सांस्कृतिक वारसा जपावा असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ,कला संगीत हे महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थी घडतो असे मत डॉ.हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले.

यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. माऊली माऊली यासह मराठी,हिंदी गीत,लावणी नृत्य सादर केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका वैशाली कराड,ज्ञानेश्वरी सत्वधर व त्यांच्या टीम ने परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी कराड यांनी केले. कार्यक्रमास नागरिक, पालक,मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!