शैक्षणिक

स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश

केज/प्रतिनिधी

जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर [माध्यमिक विभाग] शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. तुळजापूर येथील स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जयवंतराव भानुदासराव धुरगुडे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या मराठवाडा पातळीवरील सामान्य ज्ञान स्पर्धा, रुक्‍मीनबाई बजाज कामखेडकर सुगम गायन स्पर्धा रेणापुर, इंटर स्टेट चॅम्पियनशिप कराटे स्पर्धा मध्य प्रदेश, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या सर्व स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

त्याबद्दल जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे,यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक दत्ता सत्वधर,प्रबोधकांत समुद्रे,धनराज मैंद यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला.

तुळजापूर येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी जयवंतराव भानुदासराव धुरगुडे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या मराठवाडा पातळीवरील सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये घुले प्रज्ञा दिनकर सर्व प्रथम,यादव हिंदवी विष्णू सर्व तृतीय,गायकवाड ज्ञानदा सुनील सर्व चतुर्थ येण्याचा बहुमान मिळविला.रुक्‍मीनबाई बजाज काम खेडकर सुगम गायन स्पर्धा रेनापुर या स्पर्धेत देशमुख सुसंस्कृती विनोद हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले,इंटर स्टेट चॅम्पियनशिप कराटे स्पर्धा मध्यप्रदेश यामध्ये मुळे आदर्श हनुमंत याला गोल्ड मेडल मिळाले तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यामध्ये विवेकानंद शाळेला सर्व द्वितीय पारितोषिक मिळाले.

यातील सहभागी विद्यार्थी बेडस्कर शिवम सुग्रीव, इंगळे कृष्णा ज्ञानेश्वर, नेहरकर रोहित कैलास इत्यादी वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे दत्ता सत्वधर, प्रबोधकांत समुद्रे,धनराज मैंद यांचाही या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!