
केज/प्रतिनिधी
बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित,साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघात निवड झाली आहे.दि 26 नोव्हेंबर 2025 ते 01 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल, नागपूर,कोराडी रोड नागपूर येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेत साने गुरुजी निवासी विद्यालयाचा 17 वर्ष मुलींचा संघ सहभागी झाला होता.या संघातील कु.ज्ञानेश्वरी माणिक चौरे हिची महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघात निवड झाली असून सदर स्पर्धा छत्तीसगड येथे पार पडणार आहे.तर 19 वर्षे वयोगट मुलांच्या संघात चि.आदित्य अरविंद विद्यागर या खेळाडूची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.
सदर राष्ट्रीय स्पर्धा नागपूर येथे संपन्न होणार आहेत.या दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर,तालुका क्रीडा अधिकारी अनिकेत काळे सर,केज तालुका क्रीडा अधिकारी राखी यादव मॅडम,संघटनेचे अध्यक्ष श्री.दिनकर थोरात सर,सॉफ्टबॉलचे मार्गदर्शक सतीश राठोड सर,बेसबॉलचे मार्गदर्शक रेवन्नाथ शेलार सर,बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲड.उद्धवराव कराड सर, श्री.कापसे सर मार्गदर्शिका डॉ.कविता गित्ते मॅडम या सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री.रामदास सानप सर, कृष्णा गित्ते,केशव कराड, श्री.साखरे सर,श्री.घुले सर श्रीमती कांदे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.



