कृषीसामाजिक

ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटनेचे आज रास्तारोको आंदोलन 

केज/प्रतिनिधी

ऊस दरवाढीसाठीची मागणी तीव्र होत असताना विविध शेतकरी संघटनांच्या वतीने दिनांक ३ डिसेंबर,बुधवार रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक,केज येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. गंगा माऊली शुगर लि. उमरी(केज),येडेश्वरी अ‍ॅग्रो प्रॉडक्ट, आनंदगाव (सा.) तसेच अंबा सहकारी साखर कारखाना यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल ३००० रुपये आणि अंतिम दर ४००० रुपये देण्यात यावा,या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

शेतकरी संघर्ष समितीने सांगितले की, कारखानदारांकडून दर जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.योग्य दर मिळावा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्याचे आवाहन समितीने केले आहे.

या आंदोलनात भाई मोहन गुंड (शेतकरी कामगार पक्ष,केज),श्री. कुलदीप करपे जिल्हाध्यक्ष,क्रांतिकारी शेतकरी संघटना,बीड, युवा शेतकरी संघर्ष समिती तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभाग घेणार आहेत.सर्व शेतकरी बांधवांनी चक्काजाम आंदोलनात उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!