सामाजिक
मांगवडगावचे सरपंच अतुल इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद क्रांती सेनेकडून सत्कार

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मांगवडगाव येथील सरपंच श्री.अतुल इंगळे यांचा ०२ डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी आझाद क्रांती सेनेच्या वतीने तालुका प्रमुख शरद थोरात यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप इत्यादी विविध उपक्रमांनी युवा नेतृत्वाचा आणि भविष्याच्या राजकारणात सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात ठस्सा उमटवण्याची जिद्द ठेवणाऱ्या नेतृत्वाचा अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून श्री.शरद थोरात यांनी वाढदिवस साजरा करीत समाजातील लोकांना बरोबर घेऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्त त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.



