बिसेफ व लहुजी क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक माजी मुख्याध्यापक मदन जोगदंड सरांचा ५९ वा वाढदिवस उत्साहात साजरा

केज/प्रतिनिधी
बिसेफ संघटनेचे राज्य पदाधिकारी,लहुजी क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक तसेच माजी मुख्याध्यापक श्री. मदन जोगदंड सर यांचा ५९ वा वाढदिवस सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. समाजप्रबोधन,शिक्षण आणि परिवर्तनवादी चळवळीतील त्यांचे योगदान यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्वक अधोरेखित केले.
कार्यक्रमात बाबुराव गालफाडे सर,विठ्ठल जाधव सर,वैजनाथ क्षीरसागर,शहाजी जाधव सर,मनोहर गालफाडे सर, धनराज सोनवणे साहेब, अर्जुन रोडे सर,संजय कुमार देशपांडे साहेब, बाळासाहेब लोखंडे सर, सारुक सर,रघुनाथ शिंदे सर यांच्यासह अनेक मान्यवर व सहकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी मदन जोगदंड सर यांच्या शैक्षणिक सेवाकार्याचा, सामाजिक बांधिलकीचा तसेच बिसेफ व लहुजी क्रांती मोर्चामधील मार्गदर्शक भूमिकेचा गौरव केला.विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत,सामाजिक समतेच्या विचारांच्या प्रसारात आणि परिवर्तन वादी चळवळीला बळ देण्यात त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.वाढदिवसा निमित्त उपस्थितांनी त्यांना दीर्घायुष्य,उत्तम आरोग्य व समाज कार्यातील सातत्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.



