केज तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण,केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

- केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील एका गावातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या गावातीलच एका ऊस तोड मजूर तरुणाने चक्क मुलीच्या पित्याला कॉल करून तुमची मुलगी माझ्या ताब्यात आहे. असा एखाद्या सिनेमातील डायलॉग प्रमाणे कॉल करून सांगितले.
माझ्या मुलीला गुपचूप घरी आणुन सोड असे मुलीच्या पित्याने सांगूनही मुलगी घरी आलीच नाही.त्यामुळे मुलीच्या पित्याच्या फिर्यादी वरून ऊसतोड मजुरीचे काम करणाऱ्या तरुणा विरुद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा केज पोलिसात नोंद झाला आहे.
केज तालुक्यातील एका खेडेगावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे वडील साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर चालक म्हणुन काम करून ते आपल्या शेतातच राहतात.
शनिवारी दि.1 नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे गावातीलच ऊस तोड मजुराचे काम करणाऱ्या 16 वर्षीय अविवाहित तरुणाने अपहरण केले.रात्री मुलगी घरी न आल्यामुळे आईने त्यांच्या सर्वं नातेवाईका कडे शोध घेतला असता, ती कोणाकडेही आढळून आली नाही.
रविवारी दि. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान मुलीचे वडील हे केज येथील पाहुण्याकडे तिचा शोध घेत असतानाच गावातील ऊस तोड मजूर म्हणुन काम करणाऱ्या एका तरुणाने त्यांच्या भ्रमणध्वनी वर कॉल करून,तुमची मुलगी माझ्यासोबत आहे असे सांगितले.तेंव्हा गुपचूप माझ्या मुलीला घरी आणून सोड असे मुलीच्या पित्याने त्या तरुणाला सांगून देखील त्याने मुलीला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले नाही.
त्यामुळे रविवारी दि. 2 नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या पित्याच्या फिर्यादी वरून अपहरण कर्त्या तरुणाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उप निरीक्षक उमेश निकम हे पुढील तपास करीत आहेत.



