माहिती अधिकार फेडरेशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी संपादक श्री. अजय भांगे यांची फेर निवड

बीड/प्रतिनिधी
माहिती अधिकार फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या आदेशाने तसेच कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.या प्रक्रियेत दैनिक वादळवार्ता चे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.अजय भांगे यांची एकमताने बीड जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात श्री.अजय भांगे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रशासना तील पारदर्शकता वाढवण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांना आरटीआय बाबत मार्गदर्शन मिळाले असून अनेक प्रकरणांत जन हितासाठी लढे उभारण्यात आले आहेत. त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे एक सशक्त जाळे उभे करून फेडरेशनची ताकद वाढवली आहे.
फेरनिवडीनंतर अजय भांगे यांनी सांगितले की, “माहिती अधिकार हा लोकशाहीतील सामान्य नागरिकाचा प्रभावी हक्क आहे.प्रशासनातील अनियमितता उघडकीस आणत पारदर्शक व जबाबदार शासनव्यवस्था निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.या निवडीमुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.



