वरपगावच्या समस्या शासन दरबारी प्राधान्याने सोडवू – रमेशराव आडसकर

केज/प्रतिनिधी
लोकनेते स्व.बाबुरावजी आडसकरांच्या राजकीय जीवनात वरपगावची साथ उल्लेखनीय आहे. आजही माझ्या परिवारा च्या राजकारणाला या गावचा मोठा पाठिंबा असल्याने यापुढे या गावच्या समस्या सोडवण्यासाठी मी अग्रक्रमाने काम करीन असे आश्वासन रमेशराव आडसकर यांनी वरपगावच्या येथील सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयाचे भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना दिले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मठाधिपती महंत ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री,तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे,माजी तालुका कृषी अधिकारी सुरेशराव खंदारे,ॲड. रमेशराव खंदारे,हनुमंत भोसले यांची उपस्थिती होती.
केज तालुक्यातील वरपगांव येथे सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी रमेशराव आडसकर यांनी भूतकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला वरपगाव सेवा सोसायटीने भविष्यात विविध उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा अंकुशराव इंगळे यांनी व्यक्त केली.यावेळी सेवा सहकारी सोसायटी कार्यालयासाठी जागा दान दिलेल्या खंदारे परिवारातील ॲड. रमेशराव खंदारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत भोसले यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप बनसोडे यांनी तर आभार दिलीप देशमुख यांनी मानले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



