विद्यार्थ्यांमध्ये श्वान निद्रा व काक दृष्टी असावी – ॲड.उद्धवराव कराड

केज/प्रतिनिधी
दि.२२ नोव्हेंबर २०२५ रोजी साने गुरुजी निवासी विद्यालयामध्ये माध्यमिक विभागाच्या मुलांसाठी सर्जनशील विचार व मूल्य वर्धन यावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज चे संस्था अध्यक्ष अॕड.श्री. उद्धवरावजी कराड मार्गदर्शन करताना म्हणाले की,विद्यार्थी यांच्याकडे शिक्षण घेत असताना श्वान निद्रा व काक दृष्टी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्याच बरोबर हक्क आणि कर्तव्य याची तुलनाकरून जेवढे आपण हक्कासाठी जागरूक आहोत. तेवढ्याच पद्धतीने कर्तव्याची देखील जाण निर्माण व्हायला पाहिजे. शाळा महाविद्यालयातून आणि पुस्तकांमधून आपणास हक्क तर शिकवली जातात मात्र कर्तव्य अशी स्पष्टपणे कोणी शिकवत नाही.
त्यामुळे हळूहळू आपण कर्तव्याकडे दुर्लक्ष करत जातो आणि केवळ हक्का विषयी भांडखोर वृत्ती निर्माण करतो.ज्या पद्धतीने भारतीय राज्य घटनेने स्वातंत्रासारखा भारतीयांना हक्क दिला पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.आपल्याला थोर समाज सुधारक आणि साधुसंतांच्या आचार विचारातून मूल्य आत्मसात करावी लागतात.यासाठी चिकित्सक वृत्ती असावी लागते.ज्यामुळे समाजा मध्ये ज्या चांगल्या वाईट घटना घडतात यांच्यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आपण सहभागी झालो नाही तरी केवळ मूक संमतीने देखील चांगल्या वाईट गोष्टी निमुटपणे सहन केल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो.
व्यक्ती आणि व्यक्तीचे मन हे दोन्ही एकमेकावर अवलंबून असतात स्वामी विवेकानंद असे म्हणतात की,माणसाला जे शारीरिक,मानसिक, सामाजिक घटक दुर्बल बनवणार आहे त्याचा विषयाप्रमाणे त्याग करा. म्हणजे आपल्याला समाजामध्ये एक चांगला माणूस म्हणून जगताना आनंद होईल.आनंद हा स्वतःच्या सुखदुःखावर अवलंबून नसतो किंवा काही वेळा अवलंबून असला तरी तो शाश्वत नाही इतरांच्या सुखदुःखा वर आपलं सुख मानणारा व्यक्ती निर्माण होणे आवश्यक आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटले आहे की, आपण कोणत्याही जाती मध्ये जन्माला आले असाल, कोणत्याही लिंगा मध्ये जन्माला आलेले असाल किंवा शारीरिक व्यंग असाल तरी त्यावर मात करण्याचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण होय आणि म्हणून शिक्षण घेताना आपण सर्जन शीलता वृद्धिंगत केली पाहिजे त्याकरिता आपले मित्र किंवा विचार सतत चांगले असायला हवेत.
संत एकनाथ महाराजांनी म्हटल्यानुसार ढेकुनाच्या संगे हिरा ही दुभंगला त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी,शाळे साठी उद्याच्या भावी भारतासाठी अमूल्य आहात मात्र याला वाईट संगती आणि अविवेकी विचार यांचा सहवास घडल्यास आपण कमकुवत आणि ठिसूळ बनू थोडक्यात आपण मुल्य हीन बनू आणि म्हणून मूल्यशिक्षण व चिकित्सक विचार महत्त्वाचा आहे.
यावेळी अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या डॉ.कविता गीते मॅडम वरिष्ठ सहशिक्षक श्री.मोती सर,जे एन एम कॉलेजचे प्राचार्य नेहरकर सर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कांदे मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन श्रीमती वडमारे मॅडम यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्या साठी विभाग प्रमुख दस्तुरे सर यांनी अथक परिश्रम घेतले.



