आंतरशालेय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत आदर्श विद्यालय बनसारोळा येथील यश जोगदंड द्वितीय

केज/प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज आयोजित आंतरशालेय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बनसारोळा ता.केज येथील विद्यार्थी चि.यश नामदेव जोगदंड इयत्ता ५वी याने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत सर्व स्पर्धक विद्यार्थी इंग्रजी माध्यमा तील असूनही,मराठी माध्यमातील यशने अत्यंत आत्मविश्वासाने इंग्रजीत आपले सादरीकरण सादर करत परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली. प्रभावी उच्चार,स्वच्छ मांडणी व आत्मविश्वास पूर्ण सादरीकरणाच्या जोरावर यशने दुसरा क्रमांक मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
यश च्या या उत्कृष्ट यशा बद्दल त्याला मार्गदर्शन करणारे इंग्रजी विषय शिक्षक श्री.रोकडे एस. व्ही.तसेच शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम,संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे,सचिव बालासाहेब काकडे व सर्व शिक्षकवृंदांनी त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.



