शैक्षणिक

साने गुरुजी निवासी विद्यालयात चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा सुरळीत चालू 

केज/प्रतिनिधी

दि.१८ नोव्हेंबर २०२५ रोजी बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित साने गुरुजी निवासी विद्यालया मध्ये केज तालुक्यातील एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत प्रविष्ट सर्व शाळेतील एकूण १८० विद्यार्थ्यांची परीक्षा दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होत आहेत.सन २०२४-२५ पासून केज तालुक्याला साने गुरुजी विद्यालयात सह केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे.

त्यामुळे केज तालुक्यातील विद्यार्थी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच सह केंद्र दिल्याबद्दल धारूर केंद्राचे श्री आकुसकर सर यांचे सर्व केज वासीयांनी आभार मानले आहेत. सदर परीक्षेची स्वतंत्र ०४ हॉल मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.या परिक्षेची पूर्वतयारी व्यवस्थीत करण्यात आली असून साने गुरुजी निवासी विद्यालयातील कर्मचारी सुरुळीतपणे परिक्षा घेत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!