
केज/प्रतिनिधी
राज्य शासनाने अनाथ आरक्षण जीआर मध्ये बदल केला असुन पुर्वी असलेले आरक्षण आता त्यात रिक्त जागी पण अनाथ मुलाना नियुक्त करनार आहेत याचा फायदा सर्व अनाथ मुलांना नौकरीसाठी होणार आहे.
यात एक मुलगा सरकारी नोकरीला लागत होता आता तिथे पाच जण लागणार आहेत कारण जेथे जागा निघत होत्या तेथे अनाथ मुलांना जेवढी जाहिरात काढली त्याचा एक टक्के जागा वाट्याला येत होत्या परंतु आता यामध्ये राज्य सरकारने यात बदल केला असुन रिक्त जागांच्या एकुण पाच टक्के जागा येणार आहेत.म्हणजे जर ५०० जागा रिक्त असतील तर आणि त्यांनी १०० जागेची भरती काढली तर पहिली एक जागा वाट्याला येत होती पण आता तिथे ५ जागा अनाथ मुलांना मिळणार आहेत म्हणजे ५०० जागा रिक्त असतील तर ५जागा अनाथ मुलांच्या वाट्याला येणार आहेत.
यामुळे एक मुलगा नोकरीला लागणार होता आता तेथे पाच जण लागणार आहेत अशी माहिती मंत्रालयातील अधिकारी श्रीराम तांदळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.या शासन निर्णयाचे अनाथ विद्यार्थी बांधवांनी स्वागत केले आहे.



