निवडणूक

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवणार-उपप्रदेशाध्यक्षा राधाताई सपकाळ

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात नवतरूण युवकांना संधी मिळणे गरजेचे आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे उपप्रदेशाध्यक्षा राधाताई सपकाळ यांनी म्हटले आहे व बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्वांना आवाहन केले आहे की,निवडणूकीच्या मैदानात उतरू इच्छीत आहेत त्यांना हिन्दराष्ट्र संघाच्या वतीने तिकीट देण्यात येईल तरी त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे हिन्दराष्ट्र संघाच्या उपप्रदेशाध्यक्षा राधाताई सपकाळ यांनी आवाहन केले आहे.

तसेच हिन्दराष्ट्र संघ राष्ट्रीय स्तरा वरचा पक्ष आहे त्यामुळे हा संघ सर्व धर्म समभावा प्रमाणे शेतकऱ्यांचे हित जोपासले जाणारा पक्ष आहे त्यामुळे जास्तीत जास्त तरुणयुवा नेतृत्वांनी सहभागी होऊन हिन्दराष्ट्र संघाच्या वतीने बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीत उतरावे असे उपप्रदेशाध्यक्ष राधाताई सपकाळ यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!