
केज/प्रतिनिधी
वयाच्या पंचवीस तीस वर्षे होईपर्यंत शिक्षण घ्यायचे . मग नोकरी करायची.मग बायको करायची.ती नोकरदाराला मिळते,मग कसा का असेना मग दोन लेकर,एक घर,एक चार चाकी गाडी वर्षाचे सर्व सणोत्सव साजरे करायचे. ते रंगीत फोटो ,रंगीत कपडे, दागिने, हॉटेलमध्ये जेवण हे सर्व सोशल मीडियावर पाठवून आपल्यापेक्षा गरीब असणार्यांना कायम कमी लेखायचे.
शेतात काबाड कष्ट करणाऱ्याना कमी लेखायचे.त्यांना अडाणी कमी बुद्धीचे समजायचे. त्यांच्या भाषेवरून. पोशाखावरून,त्यांचे घरदार यावरून कमी लेखायचे.आपण मोठ मोठ्या बारमध्ये जाऊन इंग्लीश दारू गुपचूप दारू प्यायची आणि आपला भाऊ गावी खूप दारू पितो म्हणून त्याची जमीन घ्यायची. त्याला अडचणीत आणायचे.बायकोला आपल्या बापाच्या संपत्ती मध्ये हक्क मागायला लावायचा.त्या पैशावर एक नवीन प्लॉट वा सदनिका विकत घ्यायची. या अशा भंकस जगण्याचे स्वप्न आपण पाहतो आणि जगतो आणि मरतो.
आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय हे नोकरी मग बायको मग मुले हेच झाले आहे आणि हीच आपली माणूस म्हणून झालेली सर्वात मोठी हार आहे. पराभव आहे.हे बदलायाचे असेल ग्रामीण संस्कृतीला नवजीवन द्यायचे असेल तर या शिकलेल्या आणि नोकरीसाठी बाहेर असणार्यांनी आपली गावी एकदा जायला हवे.ते गाव पाहायला हवे.त्या गावातील परिस्थिती.आणि आपण राहत असलेल्या सोसायटीतील परिस्थती याची तुलना केली पाहिजे.
यामध्ये जर आपले गाव समान पातळीवर असेल तर आनंदी आनद आहे मात्र, जर गाव कंगाल असेल. पाण्याची समस्या असेल. रस्ता नसेल.स्मशानभूमी, व्यायामशाळा,वाचनालय,शाळेला मैदान नसेल गावची शाळा मोडकळीस आली असेल.मंदिर आणि सभागृहे काळवंडली असतील आणि त्याच वेळी तुमचा सरपंच, पंचायत समिती ,जिल्हा परिषदसदस्य, आमदार, खासदार मोठमोठ्या महालात राहत असतील आणि करोडो रुपयांच्या गाद्यामंध्ये फिरत असतील तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे.
तुम्ही शिकलेल्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे तुमच्या मायबापंचे हे हाल झाले आहेत.आता स्वातंत्र्य्याची लढाई करण्याची गरज नाही आहे.तर ग्रामपंचायत ताब्यात आल्यावर लगेच पंचायत समिती ताब्य्यात घेऊ पाहणाऱ्या आणि प्रचंड कला पैसा जमवून मतदान विकत घेवू पाहणाऱ्या या पांढऱ्या बगळ्यांना रोखावे लागणार आहे.
तुमच्या गावातील सौंदर्याला या नतद्रष्टांची नजर लागली आहे.शेतात कामकरणारा तुमचा बाप या लोकांनी रडकुंडीला आणला आहे. त्यांच्या खिशात पैसे कोंबून त्याला स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्याच्या सत्यनिष्ठ जगण्याला थट्टेचा विषय बनवले जात आहे.हे थांबायलाच हवे. याची सुरुवात शिकलेल्या पासून होईल.क्रांती सामान्य माणूस करू शकणार नाही तो त्याच्या रोजी रोटीच्याच मागे लागला आहे.त्याला बळ द्व्यावे लागेल.त्याचा हरवलेला आत्मविश्वास त्याला परत मिळवून द्व्यावा लागेल.मित्रांनो लढाई मोठी आहे परंतु अशक्य नाही असे विचार डॉ.अजय कदम तालुका प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार केज यांनी व्यक्त केले आहेत.



