उमरी पंचायत समिती गणात डॉ.कदम अजय यांच्या नावाची जोरदार चर्चा, उमरी गणास मिळणार उच्च विद्या विभूषित डॉ.उमेदवार

केज/प्रतिनिधी
केज तालूक्यातील नवीन जिल्हा परिषद गट म्हणून येवता गटाची सध्या जोरात चर्चा चालू आहे. खासदार बजरंग बप्पा यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या गटात येवता व उमरी हे दोन गणांचा समावेश होतो आहे. येवता गट महिला ओबीसीसाठी राखीव आहे तर येवता गण महिला राखीव आहे.
उमरी हा सर्वसाधारण साठी असल्यामुळे उमेदवारांची जास्त गर्दी पहावयास मिळत आहे. या गर्दीत डॉ.कदम अजय यांचे नाव जास्त चर्चेत असून,ते प्राध्यापक व प्राचार्य पदावर कार्य करूनही राजकारणात सक्रीय आहेत याचे आश्चर्यही मतदारसंघात होत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत.सर्वच पक्ष कामास लागले असून विरोधी पक्षाने बोगस मतदार याद्यांचा प्रश्न पुढे करत जनतेची मने जिंकली आहेत.शेवटी काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे.
राज्यातील वातावरण यामुळे निवडणूकमय झाले आहे. बीड जिल्हा यास अपवाद कसा असेल? नेत्यांची पोरे आणि नेत्यांसोबत फिरणारे छोटे नेते यांनी तर गण आणी गट पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.तिकडे माजी मुख्यमंत्री तथा शरद पवार यांनी आपल्या पक्षात ५० टक्के नव्या चेहरर्याना संधी देण्याचा आदेशच दिला आहे. यामुळेच की काय केज तालुक्यातील तरुण गुडघ्याला बांशिंग बांधून राजकारणात येण्याचे स्वप्न पाहत आहेत.
ज्यांनी कधीही पक्षात काम केले नाही पक्षाची ध्येयधोरणे माहित करून घेतली नाहीत अशा हवशा, नवश्या व गवशानी कार्यालये तुडुंब भरली आहेत. तर,दुसरीकडे काळ्या पैशावाल्यांनी गावच्या गाव मंदिरावर बसून विकत घेऊ अशी भाषा सुरु केली आहे. ज्यांना पूर्वी संधी मिळाली आहे,ज्यांच्याकडे ग्राम पंचायातचा कारभार आहे त्यांनी गाव बेवारस सोडून पंचायत समितीचे तोरण पायास बांधले आहे.गाव पुढार्यांनी तर गावातील जनता आपल्याच मनावर मत देते असा विश्वास नेत्यांना दिला आहे.
या सर्व धामधुमीत सामान्य जनता मात्र गोंधळून गेली आहे.मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने व पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्याचे कंबरडेच मोडून पडले आहे.त्यात आणखी भर पडली ती सोयाबीनला असलेल्या कमी भावाची.सरकारची मदत झाली परंतु केवायसीच्या हेलपाट्याने अर्धी रक्कम त्यातच जिरून गेली.हा सामान्य शेतकरी राजा आहे. मतदार आहे.या मतदात्यांच्या जीवावरच उद्याचे नेते निवडले जाणार आहेत.
स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७८ वर्षांमध्ये शेतकरी याची ही अवस्था आज आपणास पहावयास मिळत आहे मतदारसंघातील 80 टक्के जनता ही शेती, जनावरे,मजुरी याच्या बाहेर अद्याप पडलेली नाही 20% जनता पक्ष, नेते,पुढारी यांच्या नादी लागून या 80 टक्के जनतेस वेठीस भरण्याचे नवे नवे प्रयत्न किंवा फॉर्मुले काढत आहे. सामान्य मतदारांनी नेमका कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणास मत द्यावे असा एक प्रश्न मतदात्यासमोर उभा राहिला आहे.अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठां मध्ये डॉक्टर ही पदवी संपादन केलेला एक तरुण आश्वासक उमेदवार उमरी मतदारसंघास मिळणार आहे. हि एक आश्वासक अशी बाब पहावयास मिळत आहे.
डॉ.कदम अजय हे केज तालुक्याचे तालुका प्रवक्ता म्हणून 2017 पासून काम करत आहेत.तसेच त्यांनी मराठवाडा विद्यापीठांमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम केले आहे.गावातील तरुणांना सोबत घेऊन त्यांनी विविध प्रश्नांना वाट मोकळी करून दिलीआहे. संपूर्ण बदल झाला पाहिजे.भ्रष्टाचाराचासमूळ नाश झाला पाहिजे.
शिक्षणास अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे गावगाडयातील अठरा पगड जातीतील लोकांना योजनांचा लाभ भेटला पाहिजे योजना पासून कुणिही वंचित राहू नये आणि निवडणुका भयमुक्त झाल्या पाहिजेत असे महत्त्वाचे विषय घेऊन ते या निवडणुकीत मतदारांना सामोरे जाणार आहेत. तालुक्यातील कदमवाडी येथिल डॉ. अजय कदम हे आज तरी एकमेव उच्च शिक्षित उमेदवार असून त्यांनी शरद पवार साहेबांच्या पक्षाकडे उमरी पंचायत समिती गणासाठी उमेदवारी मागितली आहे.
ते शरद पवार साहेबांच्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून संपूर्ण राज्यभर ओळखले जातात.आता पक्ष उमेदवारी देईल का,आणि दिलीस तर या विद्यावाचस्पती असणाऱ्या तरुणास जनता स्वीकारेल का? हे पाहण्यायोग्य असेल. अशीही उमरी पंचायत समिती गणामध्ये जोरदार चर्चा चालू आहे.



