सौ.सरोजनी दादासाहेब ससाणे यांचा चिंचोलीमाळी जिल्हा परिषद गणात झंजावात गावभेटी व गृहभेटीवर जोर

केज/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेची निवडणूक जसीजसी जवळ येईल तशीतशी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.शिवसेना शिंदे पक्षाचे केज विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाने व त्यांच्या पत्नी माजी उप सभापती सौ.सरोजनी दादासाहेब ससाणे हे जोमाने चिंचोली माळी सर्कल मधील गावागावांना भेटी देत आहेत.लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन सोडवत आहेत. समाजकारण व राजकारणाचा ताळमेळ जोडून गृहभेटीवर जोर दिला आहे.
पंचायत समिती,तहसील कार्यालय पोलीस ठाणे,उपजिल्हा रुग्णालय या कार्यालया मध्ये ज्या ज्या लोकांच्या अडी अडचण असतील त्या प्राधान्याने सोडविण्याचे काम ते करत आहेत.या कार्याची पावती म्हणून गावा गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.चिंचोली माळी गणामधील गावा गावात त्यांचा दांडगा जन संपर्क आहे.याचा फायदा त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नक्कीच होईल.व वाढता जण संपर्क ही त्यांच्या जमेची बाजू आहे. मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे.
तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब , शिवसेना नेते रामदास भाई कदम,शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब,उद्योग मंत्री उदय सामंत साहेब,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब, मराठवाडा संपर्क प्रमुख माजी मंत्री अर्जुनजी खोतकर, मराठवाडा सचिव अशोकजी पटवर्धन साहेब,संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या जिल्हा परिषद निवडणूक चिंचोली माळी जिल्हा परिषद गटातून सौ. सरोजनी दादासाहेब ससाणे निवडणूक लढवणार आहेत. महायुती कडुन उमेदवारी मिळाली तर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.



