निवडणूक

होळ पंचायत समिती गणातून सौ.रोहिणी कुलदीप करपे निवडणूक लढवणार .

केज/प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार दि.31 जानेवारी 2026 पुर्वी नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती,महानगरपालिका निवडणूका घेणे बंधनकारक आहे.

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असुन आगामी काही दिवसांत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घोषीत होणार आहेत.बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जातीतील महिलेला आरक्षित आहे केज तालुक्यातील होळ जिल्हा परिषद गट सुद्धा अनुसूचित जातीतील महिलेलाच आरक्षित असुन गटात होणाऱ्या निवडणुकीसाठी अनेक मातब्बर उमेदवारांनी दौरे चालू केले आहेत.

होळ जिल्हा परिषद गटांच्या अंतर्गत होळ व बनसारोळा पंचायत समिती गण अनुक्रमे सर्वसाधारण महिला व अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित आहेत.क्रांतिकारीशेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या पत्नी रोहिणी करपे या महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होळ पंचायतसमिती गणात होत आहे.करपे यांच्या उमेदवारीमुळे होळ परीसरात आश्वासक चेहरा पुढे येत आहे.शेतकरी नेते कुलदीप करपे यांचे जिल्हा भरात शेतकऱ्यांसाठी चळवळीतील योगदान, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलन,मोर्चे काढून प्रशासनात दबाव ठेवून आहेत.

तब्बल 15 वर्ष नादुरुस्त असणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यां साठी कुलदीप करपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग तीन वर्षे दिलेल्या आंदोलनात्मक लढ्यांमुळे व यशस्वी पाठपुराव्यामूळे प्रधानमंत्री सडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,जिल्हा परिषद बांधकाम विभाग आदी कार्यालया मार्फत चंदन सावरगाव -जवळबन लाडेगाव-जवळबन,होळ- लाडेगाव -बोरीसावरगाव ,औरंगपूर – बनसारोळा, बनसारोळा -सौंदणा, जवळबन – सावळेश्वर- आवसगाव, कानडीबदन-डिघोळअंबा पळसखेडा -दिपेवडगाव आदी प्रमुख रस्ते मंजुऱ्या मिळवून 80 टक्के रस्ते पुर्णत्वास गेली आहेत.

होळ, बनसारोळा, जवळबन, कुंबेफळ, युसुफवडगाव, माळेगाव येथील 33 KV विद्युत उपकेंद्रां अंतर्गत असणाऱ्या कृषी पंप धारक शेतकऱ्यांना ऐन रब्बी हंगामात महावितरण कडुन होत असलेल्या सक्तीच्या वीज बील वसुलीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा केज, अंबाजोगाई महावितरण कार्यालयात आक्रमक आंदोलने करुन पूर्ववत करण्यात आला.

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय,बीड अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आडस, बनसारोळा, युसुफवडगाव संचलित होळ, लाडेगाव,जवळबन, इस्थळ आरोग्य उपकेंद्रात पुरेशी आरोग्य सुविधा मिळत नव्हती कुलदीप करपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी निवेदने देऊन वरिष्ठ कार्यालयांना पाठपुरावा करून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी,नर्स,आरोग्य कर्मचारी रुग्णांना आवश्यक असलेल्या प्राथमिक औषध गोळ्या मलमपट्टी आदि वैद्यकीय साहित्य उपलब्ध केले.

पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना तळागाळात अजून ही नागरिकांना मिळत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा,आरोग्य केंद्र,सार्वजनिक पाणी पुरवठा योजना,विद्युत उपकेंद्र,पशुवैद्यकीय दवाखाने,सेवा सहकारी संस्था,दत्तक बँका, सहकारी बँका आदि संस्थांची प्रमुख भूमिका असते.मात्र दुर्दैवाने या संस्था पूर्ण कार्यक्षमतेने चालत नाहीत या संस्था सक्षम चालवायच्या असतील तर कुलदीप करपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या कामांचा अनुभव होळ पंचायत समिती गणात नागरिकांना कामाला येऊ शकतो.

नागरिकांच्या,शेतकऱ्यां च्या प्रश्नांची जाणीव जात, धर्म,पक्ष,पंथ आदि भेदभाव सोडून सर्वांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा राखुन शेतकरी चळवळीतील कामांचा सातत्यपणा हीच कुलदीप करपे यांची जमेची बाजू आहे.त्यामुळे सौ.रोहिणी करपे यांच्या उमेदवारीला मतदार पहिल्या क्रमांका ची पसंती देऊन विजयी करतील अशी होळ पंचायत समिती गणातील विविध गावात, सार्वजनिक ठिकाणी चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!