लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नुतन सभागृहाचा उद्घाटन सोहळा दि.८ नोव्हेंबर रोजी शनिवारी, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न होणार

केज/प्रतिनिधी

सामाजिक क्रांतीचे प्रणेते, कामगार व दलित समाजाच्या हक्काचे योद्धे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने साकारलेल्या नूतन सभागृहाचे उद्घाटन केज येथे शनिवार दि.८नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३-३० वाजता करण्यात येणार आहे.
या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रमेशरावजी आडसकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जेष्ठ नेते तथा चेअरमन, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई हे असतील. तर उद्घाटक म्हणून अॕंड. गोरक्षजी लोखंडे सदस्य सचिव,दर्जा अनुसूचित जाती आयोग,महाराष्ट्र शासन मुंबई हे आवर्जुन उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत मा.आ. पृथ्वीराज साठे,अजहर ईनामदार नगरसेवक तथा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, डॉ.सौ.सिताताई बनसोड नगराध्यक्षा,नगर पंचायत केज,संदीपानतात्या हजारे रिपाइं जिल्हा कार्याध्यक्ष, डॉ.हारुणभाई ईनामदार गटनेते तथा प्रमुख जनविकास फाउंडेशन केज,राजेश घोडे आझाद क्रांती सेना हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच दशरथ जाधव,प्रियंका लांडगे,प्रा.रमेश पाटोळे, लक्ष्मण वाघमारे,योगेश गायकवाड,बाबुराव गालफाडे,रोहित कसबे, महादेव लांडगे,वैजनाथ क्षिरसागर,प्रितम भैय्या खरात,संतोष लांडगे, अनिल लोखंडे,सचिन गालफाडे,आकाश लोंढे, शरद थोरात,लखन हजारे, सुनील हिरवे ,दगडु गालफाडे,सुदेश सिरसट, शरद धिवार,मदन जोगदंड विजय लांडगे आदींची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमा साठी उपस्थित राहावे असे आवाहन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृह समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्यास नागरिक, कार्यकर्ते व सामाजिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या कार्यक्रमाचे ठिकाण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, क्रांतीनगर,कानडी रोड, केज येथे होणार आहे अशी माहिती श्री.बाबुराव गालफाडे यांनी प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले आहे.



