
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील शिंजीर मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडयुसर कंपनी केज यांच्या वतीने नोव्हेबर महिण्यात दि.7 ते 9 या कालावधीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन विठाई मंगल कार्यालय, धारुर रोड केज येथे करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील सर्व शेतकरी बांधव व्यवसायीक यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीचे संचालक विशाल चौरे यांनी केले आहे.
या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातील शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान,पाणीव्यवस्थापन,पिक व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या सहभागी होणार आहेत.केज तालुक्यात पहिल्यांदाच या कृषी प्रदर्शनाचे आयेाजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रा तील निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी विविध प्रदर्शने होतात.याच धर्ती वर केज मध्ये शिंजीर मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडयुसर कंपनीने पुढाकार घेत या कृषी प्रदर्शनाचे आयेाजन केले आहे.यामुळे केज तालुक्यातील तसेच बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान समजुन घेण्यासाठी संधी मिळणार आहे.या प्रदर्शनामध्ये प्रगत शेती
मशिनरी,आधुनिक साधने सुधारीत बीयाणे,खते, किटकनाशके,दुग्ध व्यवसाय या विषयी थेट प्रात्यक्षीके पाहण्यास मिळतील.हे प्रदर्शन शेतकरी,व्यापारी,विक्रेते, वैज्ञानिक,विदयार्थी यांच्या साठी एक व्यासपीठ म्हणुन उपलब्ध असणार आहे.
यामुळे आपल्या जिल्हयातील तसेच मराठवाडयातील शेती तील व शेतीपुरक व्यवसायातील उत्पादना साठी निश्चीतच मदत होईल.तसेच मराठवाडया तील पारंपारीक शेतीचे देखावे हे या कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे. शेतकऱ्यांनी याप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.



