उबाठा युवासेना उप सचिव मनिषा वाघमारे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात ; सामाजिक कार्याच्या भक्कम पाठबळावर जनतेत उत्सुकता

धाराशिव/प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या युवासेनेच्या महाराष्ट्र राज्य उपसचिव मनिषा वाघमारे या आगामी धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी सज्ज झाल्या असून त्यांच्या उमेदवारीबाबत जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोरोना जागतिक संकट काळात तसेच पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी तत्परतेने काम करत गोरगरीब नागरिकांपर्यंत आवश्यक मदत पोंहचवली होती. त्यांच्या या मदत कार्याची राज्यभर दखल घेण्यात आली होती.कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणीं साठी प्रशिक्षण व नोकरी मेळावे आयोजित करून हजारो युवक-युवतींना पुणे,मुंबईसह विविध ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
युवासेनेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील ग्रामीण भागात युवकांचे संघटन अधिक बळकट करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.सुशिक्षित व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या फळीमुळे त्यांचे नेतृत्व जनतेला विश्वासाचे वाटत असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अशा सामाजिक भान असलेल्या युवा नेतृत्वाची गरज असल्याने सर्व सामान्य जनतेत त्यांच्या बद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविण्याची तयारी जोरात सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
युवकांच्या अपेक्षा आणि जनतेचा पाठिंबा लक्षात घेता मनिषा वाघमारे यांचा उमेदवारीचा निर्णय जिल्ह्याच्या राजकारणात नवा बदल घडवणारा ठरू शकतो,असा विश्वास व्यक्त होत आहे.



