सामाजिक

महाराष्ट्र राज्य लोकसेवा मार्फत समर्थ राकले यांची वर्ग-१श्रेणीतील पदासाठी निवड

अकलुज/प्रतिनिधी

अकलूज येथील सुप्रसिद्ध उद्योजकश्री.संजय राकले व सुप्रसिद्ध वकील ॲड. विजयालक्ष्मी राकले यांचे सुपुत्र समर्थ संजय राकले यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग,मुंबई यांच्यातर्फे वर्ग-१ क्लास वन श्रेणीतील पदासाठी गुणवत्तेनुसार निवड झाली आहे.

एमपीएससी स्पर्धा परीक्षेत ते त्यांच्या संवर्गातून गुणवत्तेनुसार महाराष्ट्र राज्यात गुणवत्ते नुसार तिसरे आले आहेत. त्यामुळे ते आता उपजिल्हाधिकारी सहाय्यक आयुक्त /मुख्याधिकारी नगर पालिका/नगरपरिषद / पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस आयुक्त /सहाय्यक राज्यकर आयुक्त/ गटविकास अधिकारी/ सहाय्यक कामगार आयुक्त तसेच शासनाच्या इतर विभागातील सम कक्ष पदावर नियुक्तीस पात्र झाले आहेत.

त्यांच्या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह मोहिते पाटील, श्री.जयसिंह मोहिते पाटील, श्री.मदनसिंह मोहिते पाटील,आमदार श्री.रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार श्री. धैर्यशील मोहिते पाटील व संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीयांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.त्यांच्या यायशाबद्दल अकलूज व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मार्गदर्शन करणारे व प्रोत्साहन देणारे शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ.आबासाहेब देशमुख व त्यांच्या पत्नी सौ.सुनीता देशमुख यांनी समर्थ संजय राकले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला व कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!