वैद्यकीयसामाजिक

आर्यवैश्य महासभेच्या वतीने बॅटरीवर चालणाऱ्या प्रोस्थेटिक हाताच्या मोफत शिबिराचे आयोजन, गरजवंतांनी लाभ घेण्याचे आवाहन

केज/प्रतिनिधी

अपघातात व ईतर कारणांमुळे आपला हात गमावलेल्या व्यक्तींसाठी आर्यवैश्य महासभा बीड, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन,इनाली फाउंडेशन पुणे व रोटरी क्लब ऑफ पुणे डाउन टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक प्रोस्थेटिक हाताच्या मोफत स्वरूपाच्या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन बीड येथे करण्यात आल्याची माहिती महासभेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत महाजन व सचिव अजय रुद्रवार यांनी दिली आहे.

बॅटरीवर चालणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक प्रोस्थेटिक हात बसवण्यासाठी लाभार्थीला कोपऱ्या पासून पुढे 4 इंच हात असणे आवश्यक आहे हात बसवण्यासाठी कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नाही त्यामुळे हे बसवणे व काढणे सोपे आहे व हे हात दिसायला सुंदर व वजनाला हलके आणि मजबूत असे आहेत त्यामुळे अनेकांना आपले आयुष्य सुंदर व सुकर बनवण्यासाठी मदत होणार आहे.

शिबीर दिनांक 8 व 9 नोव्हेंबर रोजी बीड येथील नवगण कॉलेज रोड वरील जीवनज्योत हॉस्पिटल या ठिकाणी पार पडणार आहे तरी यासाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी करावी व या शिबिराचा लाभ गरजवंतांनी घ्यावा असे आवाहन प्रोजेक्त चेअरमन डॉ.निलेश जगदाळे 7709782133, वैभव झरकर 9422932292, राहुल बोरा,डॉ.प्रकाश कोंका यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!