लोकशाहीच्या संरक्षणा साठी खासदार सौ. रजनीताई पाटील आक्रमक पवित्रा

केज/प्रतिनिधी
राज्यसभेच्या खासदार संसदरत्न,कायम सामाजिक व सर्व सामान्य नागरिकांचे विविध विषय अभ्यासपूर्ण आणि आक्रमकपणे संसदेत मांडणाऱ्या काँग्रेसच्या खा.सौ.रजनीताई पाटील यांनी काल इंडिया आघाडीच्या आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली. निवडणूक आयोगाने घेतलेली एकतर्फी भूमिका ही लोकशाही ला घातक असून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अतिशय महत्वाच्या मुद्याला हात घातला असून यासाठी विरोधी बाकावरील सर्व खासदार याआंदोलनात सामील झाले होते.
राहुल गांधी,प्रियंका गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून बीड च्या खासदार सौ.रजनीताई पाटील या आंदोलनात होत्या अक्षरशः सरकारने पोलिसांच्या दडपशाहीने हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला परंतु खा.सौ.रजनीताई पाटील यांनी महिला खासदार असताना देखील या विरोधाला न जुमानता अडवण्या साठी टाकलेले बॅरिकेट ढकलून देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु भेटण्यासाठी जात असताना,इंडिया आघाडीतील खासदारांना पोलिसांकडून अडवण्यात आले आणि ताब्यातही घेण्यातआले.
तरीही त्या मागे हटल्या नाहीत.मत चोरीच्या विरोधात मोठे आंदोलन केले गेले.मतमोजणीत पारदर्शकता,EVM + VVPAT ची अनिवार्य पडताळणी आणि मतदार याद्यांतील फेरफार थांबवण्याच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.यावेळी खासदार सौ.रजनीताई पाटील आक्रमक झाल्या.ही लढाई राजकीय नाही ही लढाई लोकशाही, संविधान आणि ‘एक व्यक्ती,एक मत’ या अधिकाराच्या संरक्षणाची आहे ही भूमिका घेतली. लोकशाहीची होत असलेली मुस्कटदाबी विरोधात मोर्चा आक्रमक झाला.खा. सौ.रजनीताई पाटील यांनी पुढाकार घेतला.



