वैद्यनाथ अर्बन बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रवीण देशपांडे यांचा चतुर्वेद प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार संपन्न

केज/प्रतिनिधी
नुकतीच पार पडलेली दि वैद्यनाथ अर्बन को-आॕप बँक लि.परळी च्या सर्वसाधारण निवडणुकीमध्ये ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीमध्ये जनसेवा पॅनलच्या सर्व च्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून यामध्ये केज येथील उमेदवार प्रवीण भाऊसाहेब देशपांडे यांना देखील प्रचंड मते मिळाले असून ते निवडून आले आहेत. याबद्दल केज येथे चतुर्वेद प्रतिष्ठानच्या वतीने प्रवीण देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी धनंजय कुलकर्णी,चंद्रकांत पाटील,श्रीधर खोत, शिवराज मुथळे,अनंत कोकीळ,गजानन औसेकर,दिनकर नाईकवाडे,ऋषिकेश जोशी,घेवारे,किरण अस्वले आदी उपस्थित होते.सत्काराबद्दल प्रविण देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले तसेच बॕकेच्या माध्यमा तून आपण सर्वसामान्य माणसाला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणार असुन वैद्यनाथ अर्बन को-आॕप बॅकेत व्यवहार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



