प्रशासकीय

गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात तीन वर्ष खडतर सेवेबद्दल पोलिस उपनिरिक्षक स्वरूपा सुंदर संगीता नाईकवाडे यांना महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा मेडल जाहीर 

केज /प्रतिनिधी

केज शहरातील पत्रकार सुंदरराव नाईकवाडे यांची कन्या पोलिस उपनिरीक्षक स्वरूपा सुंदर संगीता नाईकवाडे ह्या जुन 2022 मध्ये पी एस आय ची ट्रेनिंग पुर्ण केल्यानंतर प्रथम नेमणूक त्यांना गडचिरोली येथे देण्यात आली एक महिना गडचिरोली येथे परत नक्षल विरोधी मोहिमेत काम करण्यासाठीत्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आली.

एक महिन्यानंतर त्यांना धानोरा येथील पोलिस ठाणे येथे नेमणुक देण्यात आली वर्ष 2022 ते 2025 ह्या तीन वर्षांत स्वरूपा नाईकवाडे यांनी अनेक मोहीमेत भाग घेतला अतिदुर्गम भागात त्यांनी चांगले काम केले तेथील आदिवासी भागातील नागरिकांची उत्तम सेवा केली. महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आदिवासी बांधवापर्यंत पोंहचवल्या तरुणाईला शासकीय,निमशासकीय सेवेत नौकरीच्या खूप संधी आहेत त्यासाठी मार्गदर्शन शिबिरात कार्य केले.पॉक्सो अंतर्गत अनेक गुन्ह्यात त्यांनी मुलींना न्याय मिळवुन देण्याचे काम केले.त्या कामी त्यांना पोलिस अधीक्षक गडचिरोली यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र ही देण्यात आले.

या तीनवर्षातील त्याच्या चांगल्या कामा बद्दल पोलिस उपनिरिक्षक स्वरूपा नाईकवाडे यांना महाराष्ट्रशासनाचा पुरस्कार पोलिस विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आहे दि.15 ऑगस्ट रोजी त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.तीन वर्षाच्या छोट्या कालावधी मध्ये हे पदक त्यांना मिळाल्या बद्दल स्वरूपा नाईकवाडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!