केज येथे पतसंस्था संचालक,कर्मचारी यांचा दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न,पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर,मा.जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था बीड यांचे विद्यमाने केज तालुक्यातील नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व कर्मचारी सहकारी पत संस्थेतील संचालक, कर्मचारी यांच्याकरिता दोन दिवसीय सहकार प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार बोर्डाचे संचालक श्री. बबनराव आंधळे हे होते.
प्रशिक्षण वर्गात बीड जिल्ह्यातील अनुभवी लेखापरीक्षक श्री.खोडसे सी.ए यांनी ठेव सुरक्षित कशी राहील आणि कर्ज प्रकरणे एन.पी.ए मध्ये जाणार नाही याबाबतची दक्षता व जबाबदारी संस्थेने कशाप्रकारे पार पाडण्यात यावी,थकित कर्जदारावर 101ची प्रकरणे,व इतर ऑडिट संदर्भात या विविध महत्त्वाच्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
समारोप प्रसंगी श्री. विशाल इंगळे सहकार अधिकारी श्रेणी 2, पत्रकार श्री.चंद्रकांत पाटील,श्री.बबनराव आंधळे,श्री.सी.ए खोडसे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन वर्ग संयोजक श्री. एस.आर कोले उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांनी केले.



