सामाजिक

ज्येष्ठ नागरिक संघ केज यांच्या वतीने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात,३५ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी हस्तांतरित

केज/प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे गंभीर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी केजशहरातील ज्येष्ठ नागरिक संघ पुन्हा एकदा पुढे आला आहे. संघाच्या २३ सदस्यांनी एकत्रित येत तब्बल ३५,००० रुपयांचा निधी गोळा केला असून हानिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करण्यात आला आहे.

समाजकार्यात सक्रिय सहभागाची नवी प्रेरणा देणारा हा उपक्रम काल संघाच्या बैठकीत पार पडला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून Fedretion of Senior Citizen Organization of Maharashtra (FACECOM) चे दक्षिण विभाग अध्यक्ष श्री. दामोदर थोरात व दक्षिण विभागसचिव श्री.जगदीश जाजू अंबेजोगाई उपस्थित होते.अतिथींच्या हस्ते हा निधी डी.डी.च्या स्वरूपात मुख्यमंत्री सहायता कक्षाला देण्यासाठी हस्तांतरित करण्यात आला.

संघातील ज्येष्ठांनी दिलेल्या आर्थिक मदती बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचा पाहुण्यांनी पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संघातील सदस्य श्री.नारायण अंधारे व श्री. मोहनराव केजकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी दोन्ही मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करताना सांगितले की, “आत्ताच नवीन स्थापन झालेला केजचा ज्येष्ठ नागरिक संघ असूनही इतक्या मोठ्या प्रमाणावर मदत रक्कम गोळा करणे ही अभिमानास्पद बाब आहे. समाजसेवेची ही भावना प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

निधी उभारणीसाठी अध्यक्ष श्री.राजेसाहेब पापा देशमुख,सचिव श्री. गदळे जी.बी,कोषाध्यक्ष श्री.रामेश्वर जाजू,सह सचिव श्री.साखरे डी.एस, श्री.अंकुशराव अण्णा इंगळे, श्री.लक्ष्मण जाधव सर,अॕड.विजय कुलकर्णी, श्री.इंदानी,श्री.मधुकर लांडगे,श्री.रामचंद्र जाधव, श्री.निर्मळ,श्री.तात्याराव मुळे,श्री.जीवन थोरात, सोनी,उंबरकर,ज्ञानोबा देशमुख,कल्याणकर, डोंगरे, इंदानी,रोडे, क्षीरसागर,रामराव राऊत, संभाजी कापरे आदी मान्यवर सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण श्री.रामेश्वरजी जाजू यांनी करत समारोप केला.कार्यक्रमाचे सुत्र संचालन सहसचिव श्री. साखरे डी.एस यांनी तर श्री.मधुकर लांडगे यांनी आभार प्रदर्शन केले.“खरा तो एकाची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या भावगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. अल्पोपहारा नंतर हा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!