
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील गौरवाडी येथील दलित वस्तीतील रहिवासी रामा लक्ष्मण दुनघव यांनी आपल्या कुटुंबासह तसेच गुरं-जनावरांसहित तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.या उपोषणा दरम्यान त्यांनी तहसील प्रशासनाने तात्काळ चौकशी करून शेतरस्ता वहीवाटीसाठी खुला करावा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करावी.अशी ठाम मागणी केली होती.
या अन्यायाविरुद्ध आझाद क्रांती सेनेचे संस्थापक राजेश घोडे तसेच तालुका प्रमुख शरद थोरात यांनी पुढाकार घेत आंदोलनास पाठिंबा दिला आणि प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून दलित मातंग समाजातील ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे.
तहसील प्रशासनाने चौकशी करून वस्तीला जाणारा शेतरस्ता वाहिवाटीसाठी नवीन मार्गाने तयार करून देण्यास सुरवात केली आहे.तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा पुन्हा चालू करण्याचे आदेश दिले आहेत.या निर्णया नंतर वस्तीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामस्थांनी आझाद क्रांती सेनेचे संस्थापक राजेश घोडे तालुकाप्रमुख शरद थोरात यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले.
थोरात यांनी यावेळी सांगितले की,आझाद क्रांती सेना नेहमीच अन्यायाविरुद्ध उभी राहील.समाजातील वंचित घटकांचा आवाज दबू दिला जाणार नाही.न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील.या प्रसंगी सेनेचे कार्यकर्ते,ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



