सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकट राम यांचा अवैध धंदेवाल्यांना दणका,अवैध धंदे कराल तर कोठडीत रवानगी होणार

केज/प्रतिनिधी
केज येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नुकतेच रुजु झालेले व्यंकट राम पत्रकार यांनी परिषदेत अवैध धंदे करणाऱ्यांना सज्जड दम दिला असून कार्यक्षेत्रात मटका,गुटखा,हातभट्टी दारु, जुगार, गांजा,बनावट दारू,वेश्या व्यवसाय,भु माफिया,गुंडागर्दी करणारे गुन्हेगार तसेच विट भट्टी व इतर ठिकाणी बाल कामगार दिसुन आल्यास जेलची हवा खावी लागणार आहे.
यापुर्वी कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या कार्यकाळात अवैध धंदे करणाऱ्यांनी जबर धास्ती घेतली होती.परंतु त्यांच्या बदलीनंतर अवैध धंदेवाल्यांना मोकळे रान मिळाले होते.त्यामुळे आमचे कोणीही काहीच करु शकत नाही अशा आविर्भावात राजरोसपणे अवैध धंदे चालवत होते. आणि सर्वसामान्यजनतेचे संसार देशोधडीला लावले आहेत. यापुढील काळात सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकट राम यांच्या सारखा खमक्या अधिकारी आल्याने अवैध धंदेवाल्यांना चपराक बसणार असून त्यांचे धाबे दणाणले आहेत.



