केज तालुक्यातील कोरेगाव येथे घराचे कुलूप तोडून साडेपाच लाखाचे दागिने चोरले, केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील कोरेगाव शिवारातील वैतागवस्ती येथील शेतकरी बळीराम तांदळे हे कुटुंबातील सर्वांना घेवून भाऊबीजेच्या दिवशी घराशेजारी असलेल्या शेतात गेले असता गुरूवारी दि.23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा चार ते साडे पाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी त्यांच्या राहत्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून पेटीत व धान्याच्या कोठीत ठेवलेले 5 लाख 81 हजार 500 रुपयाचे घरात ठेवलेले 27 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील कोरेगाव शिवारातील वैतागवाडी वस्तीवर येथे गुरुवारी दि.23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा चार ते साडे पाच वाजण्याच्या दरम्यान बळीराम भगवान तांदळे हे आपल्या पत्नीसह घरा शेजारीच असलेल्या शेतात गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लोखंडी चॅनल गेटचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला.
व घरात ठेवलेल्या पेटी आणि धान्याच्या कोठीत ठेवलेले 8 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या ,सोन्याचा हार, नेकलेस ,मिनी गंठण, झुंबर ,वेल ,चैन ,अंगठ्या , सोन्याची पोत ,नथ, सोन्याची साखळी ,सेव्हन पीस, सोन्याचे फुलं, सोन्याच्या काड्या असे एकूण 27 तोळे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे जुने वापरातील दागिने ज्याची किंमत 5 लाख 81 हजार 500 रुपये आहे. या दागिन्यांची चोरी करून अज्ञात चोरट्यानी पोबारा केला.
बळीराम तांदळे यांच्या फिर्यादी वरून केज पोलिसात शुक्रवारी मध्यरात्री पावणे एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे पुढील तपास करीत आहेत.

