सामाजिक

केज नगर पंचायतच्या नगराध्यक्ष डॉ.सौ. सिताताई बनसोड व गटनेते डॉ.हारुणभाई इनामदार यांची अॕड. नवनाथराव मुंडे यांच्या निवासस्थानी दीपावली निमित्त सदिच्छा भेट, अॕड.मुंडे दाम्पत्यांनी केला विकास कामांचा गौरव

केज/प्रतिनिधी

दीपावली सणाच्या निमित्ताने केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा डाॕ.सौ.सिताताई बनसोड व गटनेते डॉ.हारुणभाई इनामदार यांनी अॕड. नवनाथराव मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.या भेटी दरम्यान केज शहरातील विविध विकास कामा बाबत चर्चा झाली तसेच नगरातील नागरिकांच्या हितासाठी होत असलेल्या कामांचा गौरव करण्यात आला.केज शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेली नदी सुशोभीकरण योजना,रस्ते विकास तसेच जिरायत खात्याच्या जमिनीचे अधिग्रहण अशी सुरू असलेली विविध कामे या काळातगतीमान झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या विकास कामांच्या यशस्वी अंमलबजावणी साठी नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड मॅडम आणि डॉ.हारुणभाई इनामदार यांचे कौतुक अॕड.श्री व सौ.मुंडे यांनी केले.यावेळी डॉ.सौ. सिताताई बनसोड मॅडम यांनी समर्थ नगर परिसरातील सर्व सामान्य नागरिकांच्या गरजा,अडी अडचणी आणि अपेक्षा लक्षात घेऊन पुढील काळात अधिक व्यापक विकास कामे हाती घेण्याचे आश्वासन दिले. शहरातील सौंदर्यवृद्धी, स्वच्छता आणि मूलभूत सोयी सुविधांच्या उन्नती साठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि समाजहिताच्या कार्यासाठी परस्पर सहकार्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमास अॕड.सौ. जयश्रीताई मुंडे, अॕड. सुदर्शन मुंडे, स्थानिक नागरिक मुंडे दुकानदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या असून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान आठ दिवसातील एक दिवस सर्व प्रभागातील छोट्या मोठ्यासमस्या सोडविण्या साठी द्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!