बनसारोळा येथील आदर्श विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न शिक्षकांचा शाल,श्रीफळ व फेटा बांधून केला सन्मान

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील आदर्श विद्यालयात शनिवारी माजी विद्यार्थ्यांचा भव्य आणि भावनिक मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला.२००६ च्या दहावी च्या व २००८ च्या बारावी च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे हा मेळावा आयोजित केला होता.
जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी,शिक्षक आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोकराव काकडे, सचिव बालासाहेब काकडे, मुख्याध्यापिका सौ.सिंधुताई चव्हाण,वृक्ष मीत्र सुधाकर देशमुख, दिलीप पारेकर,बन्सीधर देशमुख,राजेंद्र मस्के, गणपत पांचाळ,शिवाजी मांदळे,संतोष रोकडे, काळे मॅडम आणि विष्णू कावळे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणींवर आधारित सादरीकरणे,कविता,गाणी व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांचे मन जिंकले. शिक्षकांना फेटे बांधून,पुष्पहार अर्पण करून,शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
वातावरणात एक प्रकारचा भावनिक आणि आनंददायी उत्साह पसरला होता.या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत शाळेतील अनुभवांची आठवण ताजी केली. जुन्या मित्रमैत्रिणींची भेट,शालेय जीवनातील गंमती जमती आणि आठवणींनी सर्वांनाच भूतकाळात नेले मेळाव्याच्या निमित्ताने जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेत जुने दिवस आठवले.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत पुढील काळात अशा मेळाव्यांचे सातत्य राखावे असे आवाहन केले.
मेळाव्यात सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यां मध्ये नवनाथ काकडे, भूषण करपे,राहुल शिंदे, प्रतिभा क्षिरसागर,कल्पना शिंदे,प्रमोद जोगदंड,उषा टोणगे, सविता जाधव, सूरज लोखंडे,छायावैरागे, ज्ञानेश्वर गोरे,निलेश गोरेमाळी,राजकुमार वाघचौरे,माचिंद्र आंबाड, धोंडिराम बंडे,बालाजी गोरे,शिल्पा मस्के, व्यंकटेश नाईकवाडे,प्रज्ञा जाधव, देवराव कोकणे, बालकृष्ण यादव,कुलदीप करपे,बालिका पवार, पल्लवी डांगे,सुलोचना गोरे,पूनम मुळे,सरलाशिंदे आणि भारती काकडे आदींचा समावेश होता.
मेळाव्याचे सूत्रसंचालन कल्पना शिंदे आणि प्रतिभा क्षिरसागर अत्यंत देखण्या व विनोदी शैलीत पार पडले, तर शेवटी सर्व उपस्थितांनी “आदर्श विद्यालयात पुन्हा भेटू या” असा संकल्प व्यक्त केला.



