
केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक 2३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळीअंकप्रदर्शन, भाऊबीज व बालवाचक ग्रंथवाचन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
सर्वप्रथम भाऊबीज साजरी करण्यात आली.त्यानंतर दिवाळीअंक प्रदर्शन घेण्यात आले.त्यानंतर बालवाचकांचे टप्प्या टप्प्याने ग्रंथवाचन घेण्यात आले.ग्रंथवाचन यशवंत हणुमंत सौदागर, वेदांत शिवदास घाडगे, कृष्णराजे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले.त्यानंतर दिवाळी अंक प्रदर्शन घेण्यात आले. यावेळी दिवाळी अंकाचे वाचन बाळासाहेब गायकवाड, रमेशराव गायकवाड यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रामराजे गायकवाड, नारायणभाऊ गायकवाड,एम.आय.टी. पुणे चे गोविंद गायकवाड, बापूराव गायकवाड, बळीराम गायकवाड, ए.बी.गायकवाड,शिवाजी नांदे यांची उपस्थिती होती.दिवाळी अंक प्रदर्शनात वाचक, हितचिंतक, विद्यार्थी, युवक,जेष्ठ नागरीक यांनी सक्रीय सहभाग घेतला. सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य रमेराराव गायकवाड हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य, डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.



