
केज/प्रतिनिधी
दि.२१ ऑक्टोबर २०२५ रोजी मौजे कोरेगाव येथील भुमीपुत्र गणेश नारायण तांदळे व अश्विनी अनिल बडे यांनी ह.भ.प. आचार्य अर्जुन महाराज लाड व ह.भ. प. प्रल्हाद महाराज शास्त्री ढाकणे यांच्या शुभाशीर्वादने अनिल हॉटेलच्या शेजारी, बीड रोड केज येथे अनिल क्लिनिकल लॅबचे उद्घाटन झाले आहे.जिथे रुग्णाच्या रक्त ,मूत्र ,मल ,थुंकी ,पेशी ,विर्य इत्यादी नमुन्यांवर वैज्ञानिक तपासण्या केल्या जातील.
या तपासण्यामुळे रुग्णाच्या शरीरातील आजारांचे निदान,उपचाराचेनियोजन आणि आरोग्य स्थितीचे निरीक्षण करता येईल.क्लिनिकल लॅब हे आधुनिक वैद्यकशास्त्रा तील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे रुग्णाचे आजार निदान,उपचार,व प्रतिबंध या सर्व प्रक्रियां मध्ये अशा लॅबची निर्णायक भूमिका असते.
सदरील उद्घाटन प्रसंगी कोरेगावचे समस्तगावकरी मंडळी हे उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे, त्याच प्रमाणे कोरेगांवचे विद्यमान सरपंच श्री.दत्ता किसन नागरगोजे,माजी सरपंच बालाजी तांदळे, डॉ.अजित तांदळे, ॲड. वसंत तांदळे, ॲड.कैलास घुले ,डॉ.डी.तांदळे ,डॉ. गोरख तांदळे, डॉ.दिलीप चाळक ,डॉ.ब्रह्म डोईफोडे, डॉ.अस्वले, डॉ.कैलासमुंडे, डॉ.योगिनी थोरात, डॉ.पांडुरंग तांदळे, डॉ.योगेश्वरी थोरात, डॉ.रमाकांत नेहरकर, डॉ.टोपे, डॉ.वायबसे, डॉ.कुटे, डॉ.मिसाळ, डॉ.मुलाणी, डॉ. डापकर, इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.



