
केज/प्रतिनिधी
केज शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून कार्यरत असलेल्या गुरुकृपा योगा अकॅडमी कडून महिला,पुरुष व लहान मुलांसाठी एक महिन्याचे मोफत योगा डेमो क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे.दि.1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान क्लासचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे 5 -15 ते 6-30 यावेळेत भवानी मंदिर,धारुर रोड,केज येथे व सकाळी 11- 00 ते 12-00 यावेळेत आवाड एज्युकेशनल अकॅडमी, कानडी रोड केज येथे या क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला-पुरुषांचे विविध शारीरीक समस्या, लहान मुलांमधील स्थूलता याविषयी माहिती देवून योगासने करून घेतली जाणार आहेत.
तरी जास्तीत जास्त महिला पुरुषांनी व लहान वयोगटातील मुलांनी या एक महिन्याच्या मोफत क्लासचा लाभ दोन्ही वेळे पैकी आपल्या सोयीच्या वेळे नुसार घ्यावा असे आवाहन संचालिका योगशिक्षिका सुवर्णा शेटे यांनी केले आहे.



