मेजर राम राऊत चिंचोली माळी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवाशी असलेले मेजर राम राऊत सैन्य दलातुन निवृत्त झाल्यानंतर समता परिषदेच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा प्रचंड मोठा जन संपर्क असुन ते माजी सैनिक संघर्ष समितीच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या प्रश्नांसाठी व उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहेत.
सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्या साठी ते सदैव कार्यरत आहेत.चिंचोलीमाळी पंचायत समिती गण हा सर्व साधारण पुरुष गटाला सुटला असुन ते सर्व साधारण गटातुन पंचायत समितीची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. उच्च शिक्षीत असलेले मेजर राम राऊत हे गेल्या पंधरा वीस वर्षापासून निस्वार्थीपणे कार्यरत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व शासनाच्या विविधयोजना मिळवुन देण्यासाठी आपण चिंचोली माळी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार आहोत तसेच गेल्या २० ते २५ वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत चिंचोलीमाळी व परिसरात त्यांचा खुप चांगला मित्र परिवार असुन अजातशत्रू म्हणून प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
या गणात असलेल्या सर्व समाजा तील मतदारांचा आपल्याला पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.दरम्यान चिंचोली माळी जिल्हा परिषद गण हा ओबीसी महिला गटाला सुटला असल्याने व पंचायत समिती गण हा सर्व साधारण पुरुष गटाला सुटला असल्याने या गणात निवडणूक रंगतदार होणारअसल्याचे चित्र दिसून येत आहे.



