
केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय बीड,जिल्हा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बेसबॉल व सॉफ्टबॉल स्पर्धा दिनांक 18-10 2025 रोजी क्रीडा संकुल बीड येथे संपन्न झाल्या. यात साने गुरुजी निवासी विद्यालयाचे एकूण सहा संघ जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे सदर संघ विभाग स्तरासाठी बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. यात 14 वर्ष मुले,मुली बेसबॉल,सॉफ्टबॉल प्रथम, 17 वर्ष मुले,मुली बेसबॉल,सॉफ्टबॉल प्रथम,19 वर्ष बेसबॉल, सॉफ्टबॉल प्रथम या 06 संघाने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
सदर 6 संघ परभणी व छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेचे बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. या संघास क्रीडा मार्गदर्शिका प्राचार्य डॉ. कविता कराड,क्रीडा शिक्षक श्री.रामदास सानप सर, क्रीडा सहाय्यक श्री.घुले सर, बेसबॉलचे क्रीडा मार्गदर्शक श्री. रेवन्नाथ शेलार सर जिल्हा क्रीडा संकुल बीड, सॉफ्टबॉलचे मार्गदर्शक राठोड सर जिल्हा क्रीडा संकुल बीड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
सदर शाळेचे संघ गेली दहा वर्षापासून सातत्याने राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त करत असून राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू आपला नावलौकिक करत आहेत याबद्दल बीडजिल्हा क्रीडा कार्यालयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.अरविंद विद्यागर सर,बेसबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील थोरात सर, अनिकेत काळे सर तालुका क्रीडा अधिकारी, जितू आरक सर,मंगेश सर व संस्थेचे अध्यक्ष ॲड. उद्धवराव कराड,कापसे सर सर्व शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या आहेत.



