प्रशासकीय

केज शहरात सर्वत्र अंधाराचे सावट,ऐन दिवाळीच्या सणात महावितरणचा शिमगा, अंधेरा कायम रहेगा असे चित्र,विद्युत रोहित्रावर प्रचंड ताण आल्याने होत आहेत स्फोट 

केज/प्रतिनिधी

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण परंतु ऐन सणासुदीच्या काळात महावितरण कंपनीने शिमगा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे काय असा प्रश्न निर्माण होत आहे. अंधेरा कायम रहेगा असे ऐन सणासुदीच्या काळात ठरवले आहे काय असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहेत. दिवाळी हा सर्वांसाठी आनंदाचा,उत्साहाचा, मांगल्याचे प्रतिक असलेला सण सर्वत्र प्रकाशाने उजळून निघणारा हा सण विद्युत रोषणाई करुन अवघा आसमंत उजळून निघतो. परंतु महावितरण कंपनी ला यांचे सोयरसुतक असल्याचे दिसून येत नाही.अपुरी साधनसामग्री व नियोजनाचा अभाव असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

लोकप्रतिनिधींना याच्याशी काही देणे घेणे नाही काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.१० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवला आहे आता सतत विद्युत पुरवठा होणार अशी सोशल मिडीयावर पोस्ट करुन फोटोसेशन केले खरे परंतु अपुरी साधनसामग्री व झिजलेल्या तारा सतत तुटून पडत असल्याने विद्युत पुरवठा सतत खंडित होत आहे.याचा व्यापारी व सर्व साधारण लोकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी प्रशासन व शासनाच्या प्रतिनिधींनी यात लक्ष घालून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरीक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!