केज येथे बसस्थानका समोर भर रस्त्यावर थरार दोन गटात तलवार,चाकू व लोखंडी झाऱ्याने हाणामारी

केज/प्रतिनिधी
केज येथील बसस्थानका समोर भर रस्त्यावर सोमवारी रात्री 9 वाजण्या च्या दरम्यान दोन गटात तलवार,चाकू व लोखंडी झाऱ्याने हाणामारी झाली असून परस्पर विरोधात एकूण 16 जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हे नोंद झाले आहेत.
सोमवारी दि. 13 ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून लोखंडी झाऱ्याने,बेल्टने व लाथा बुक्क्याने मारहाण करून खाली पाडून डोक्याचे केस पकडून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन धार्मिक भावना दुखावल्याची फिर्याद वेल्डिंगचे वर्कशॉप चालविणाऱ्या धरमसिंग दिलदारसिंग गोके याने दिल्यावरून सय्यद इर्शाद, सय्यद इम्रान, सय्यद गज्जू, नदीम सय्यद,अजहरशेख, अल्ताफ शेख,सोहेल पठाण,बब्या ( पूर्ण नाव माहित नाही )या आठ जणांविरुद्ध केज पोलिसात सोमवारी रात्री साडे आकरा वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे
तर दुसऱ्या प्रकरणात सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान आरोपीतांनी संगनमत करून सय्यद इर्शाद व त्याच्या भावावर त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने,चाकूने,छातीत, डोक्यात,व उजव्या पायाच्या मांडीवर वार करून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून सय्यद इर्शाद यांच्या फिर्यादीवरून शंकरसिंग गोके,अमरसिंग गोके, दिलदारसिंग गोके व इतर अनोळखी 4 मिळूनएकूण 7 आरोपी विरुद्ध केज पोलिसात बुधवारी रात्री साडे दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्हीही गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर हे करीत आहे.



