आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बनसारोळा येथे इंग्रजी उपक्रम, वर्ल्ड हेरिटेज साईट्स एक्झिबिशन

केज/प्रतिनिधी
दिनांक ३ ऑक्टोबर २०२५,शुक्रवार रोजी वर्ग दहावी मध्ये द वर्ल्ड हेरिटेज साईट्स एक्झिबिशनचेआयोजन करण्यात आले.या प्रदर्शनामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.या एक्झिबिशनमध्ये विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती ,ताजमहाल, गोल घुमट ,कुतुबमिनार, लाल किल्ला अशा विविध जागतिक वारसा स्थळांच्या सुंदर प्रतिकृती तयार केल्या होत्या.प्रत्येक प्रतिकृती त विद्यार्थ्यांची कल्पकता,मेहनतआणि इतिहासावरील अभ्यास स्पष्टपणे दिसून येत होता.
या प्रदर्शनाला वर्ग पाचवी ते दहावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृतींबद्दल सविस्तर माहिती सांगून पाहुण्यांना जागतिक वारसाचे महत्त्व पटवून दिले.या एक्झिबिशनचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्री.बालासाहेब काकडे सर,मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम, तसेच साळुंकेसर आणि कावळे सर यांच्या हस्ते झाले.मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
हा शैक्षणिक उपक्रम दहावीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील “The World Heritage” या धड्याच्या अनुषंगाने घेण्यात आला होता. इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री.एस.व्ही.रोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जागतिक वारसा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला व विद्यार्थ्यांच्या मनावर सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश सोडून गेला.



