शैक्षणिक

साने गुरुजी निवासी विद्यालय ही ऊसतोड शाळा राज्यातील पहिल्या दोन ते तीन क्रमांकाची शाळा आहे – लक्ष्मण बारगजे

केज/प्रतिनिधी

बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित साने गुरुजी निवासी प्रा.मा. उच्च माध्यमिक विद्यालय केज व मा.श्री नरेंद्रजी मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्था केज यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन 2026 या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय बीडचे निरिक्षक श्री.लक्ष्मण बारगजे यांनी सांगितले की,आमच्या विभागाच्या राज्यात 953 शाळा असून मी जिल्ह्यात व राज्यातील शाळा तपासणी करिता सर्व शाळांना भेटत असतो राज्यातील इतर शाळा पाहताना मला प्रकर्षाने जाणवले की,ही ऊसतोड शाळाराज्यातील पहिल्या दोन ते तीन क्रमांकाची शाळा म्हणून नावलौकिक प्राप्त करत आहे.विद्यार्थ्यांनो तुम्ही फार नशीबवान आहेत तुमच्या आई वडीलांनी तुमच्यासाठी ही शाळा निवडली आहे.तुमचे आई वडील ऊसाच्या फडात रक्ताचे पाणी करून फार कष्टाने तुम्हाला येथे शिकायला ठेवले आहे याची तुम्ही जाण ठेवली पाहिजे या शाळेने विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हास्तरीय, विभागस्तरीय,राज्य स्तरीय व राष्ट्रीय स्तरावर किती तरी पारितोषिक मिळवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे असे गौरवोद्गार काढून शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड साहेब यांनी सांगितले की,आमची शाळा ही संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहे.मला याची जाणीव आहे आम्ही यांच्यासाठी काम करतो हे ब्रीद वाक्य घेऊन आमचे सर्व कर्मचारी बंधू,भगिनी शाळेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहेत आम्ही कोणत्या घटकांसाठी कार्य करत आहे याची आम्हाला जाणीव आहे.आम्ही जरी परिपूर्ण नसलो तरी पण आमच्या काही उणीवा आहेत याची आम्हाला कल्पना आहे.आम्ही चांगल्यात चांगल्या पद्धतीचे दर्जेदार पद्धतीचे शिक्षण देण्याचे काम करत आहोत आमच्या ऊसतोड शाळेची प्रवेश प्रक्रिया ही एक मे रोजीच पुर्ण होते असे मार्गदर्शन केले आहे.

या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध वेशभुषा परिधान करून आदिवासी गीत,बंजारा गीत,शेतकरी गीत, राजस्थानी गीत,कोळी गीत,कामेडी गीत,बाल गीत,मल्हारी गीत, रिमिक्स गाण्यावर मनसोक्त आनंद लुटला, विज्ञान नाटिका सादर करुन उपस्थितांची मने जिंकली या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाल पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात पालकांनी सहभाग घेतला शाळेने बाहेर गावाहून आलेल्या माता पालकांची निवासी राहण्याची सोय केल्यामुळे पालकांनी आनंद व्यक्त केला.या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश कापसे,अरुण चाटे सरपंच तांबवा, गोपाळ वेताळ सरपंच घागरवडा,दिपक काळे सरपंच जिवाचीवाडी, महादेव चोले,ज्ञानोबा मैंद,आसाराम मैंद आदी मान्यवर उपस्थित होते अहवाल वाचन श्रीमती सुवर्णा सिरसट यांनी केले संचलन श्रीमती श्रुती लहाने,श्री.गुजर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाच्या प्राचार्या डॉ.कविता कराड मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!