केजच्या गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकरला तात्काळ अटक करा के.वि.सं.स.

केज/प्रतिनिधी
केजच्या प्रभारी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला असून आरोपी लक्ष्मण बेडसकर ला तात्काळ अटक करा तसेच या घटनेत जे लोक घटनास्थळी कांहीं मिनिटात पोहोंचले तसेच त्यांनी घटनास्थळाचे व्हिडिओ काढलेले आहेत आणि आरोपी बेडसकरच्या गाडीतील मोबाईल काढून घेतला आहे.
यामुळे या प्रकरणात लक्ष्मण बेडसकर तर दोषी आहेच परंतु निर्जन ठिकाणी पोहोंचेपर्यंत सोबतच्या लोकांनी आरडाओरड का केली नाही अशा शंका उत्पन्न होत असल्याने सोबत असणाऱ्या व पाठलाग करत लगेच मागे पोहोंचलेल्या लोकांची ही सखोल चौकशी करावी अशी मागणी केज विकास संघर्ष समितीने केली असून आरोपीला तात्काळ अटक करून पीडितेला न्याय न मिळाल्यास जनतेच्या सहभागाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
केज येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा येथील प्रभारी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने केज पोलिसांकडे केली आहे. मात्र आज तिसऱ्या दिवशीही आरोपी लक्ष्मण बेडसकर फरार आहे.
बेडसकर यांच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंग पाहता हा व्यक्ती महिला व मुलींच्या सतत संपर्कात असल्याचे जाणवते. याच त्याच्या वृत्तीचा अंदाज घेऊन कांही लोकांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्याला जाळ्यात ओढले आहे. मात्र याच वेळी अशा जाळ्यात अडकण्या साठी बेडसकर काही लहान बालक नाही. त्यामुळे प्राप्त माहिती वरून या प्रकरणात समाज व कायद्याच्या नजरेत निर्दोष दिसत नाही.तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणाचा फायदा घेऊन या घटनेला घडवण्यासाठी कांहीं लोकांची टोळी मदत व काम करत असण्याची शक्यताही बोलली जाते.
त्यामुळे केज पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला व या घटनेत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभागी लोकांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करावी आणि या घटनेतील पूर्ण सत्य बाहेर आणावे अशी मागणीही समिती ने केज पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.कांहीं लोक आपल्या फायद्यासाठी अशा घटना पूर्व नियोजित पद्धतीने घडवून केज व परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण बनवत असतील तर त्यांचा बंदोबस्त होणेही गरजेची आहे असेही निवेदनात म्हटले आहे.
आरोपीला व प्रकरणात सहभागी लोकांना तात्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.