सावधान!केज मध्ये फेक फोन पे एस.एम.एस व कॉलद्वारे आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न

केज/प्रतिनिधी
केज शहरातील अशोक विठ्ठल गायकवाड या व्यक्तीला अज्ञात नंबर वरून संशयास्पद कॉल आला.आणि सांगण्यात आले कि,तुमच्या फोन पे वर २५०००/- रुपये पाठवले आहेत कारण माझा फोन पे नंबर ला पैसे जात नाहीत म्हणून तुमच्या नंबर वर टाकलेत आणि अशोक गायकवाड या व्यक्तीला २५०००/- रुपये आपल्या खात्यात जमा झाले आहेत.असा फोन पे वर आणि टेक्स्ट एस.एम.एस.आला. आलेल्या रकमेतून २,०००/-रुपये मला तात्काळ परत फोन पे वर पाठवा,” अशी मागणी केली.मात्र, गायकवाड यांनी तात्काळ आपले खाते तपासले असता, कोणतीही रक्कम जमा झालेली नव्हती.
एस.एम.एस.पूर्णपणे फेक असल्याचे स्पष्ट झाले.आश्चर्याची गोष्ट मात्र दोन्ही व्यक्ती एकमेकांना ओळखत नव्हते.त्यामुळे फसवणुकीचा हा प्रयत्न अपयशी ठरला.मात्र या प्रकारामुळे नागरिकांना पुन्हा एकदा सावध राहण्याचा ईशारा मिळाला आहे.अज्ञात नंबरवरून आलेले फोन किंवा एस.एम.एस.वर विश्वास ठेवू नये,तसेच कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्या पूर्वी स्वतःचे बँक खाते तपासून खात्री करून घ्यावी,असे आवाहन करण्यात येत आहे. खोटे एस.एम.एस. आणि कॉलद्वारेआर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत.
अशा संदेशांवर विश्वास ठेवून पैसे पाठवू नयेत.
त्वरित बँक,पोलिसांना माहिती द्यावी अशी माहिती पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी दिली आहे.



