पवन करवर यांच्या वरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध – ॲड. सुभाष राऊत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची समता परिषदेची मागणी

बीड/प्रतिनिधी
जालना येथे आयोजित धनगर समाजाच्या मोर्चात सहभागी होण्या साठी जात असताना माजलगाव जवळील एका धाब्यावर ओबीसी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते पवन करवर यांच्यावर काही जातीय वादी गुंडांनी जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्या चा समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. सुभाष राऊत यांनी निषेध व्यक्त केला असून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी समता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले आहे. आरक्षणाची मागणी शासनाकडे आहे,प्रत्येक जण आपापल्यापरीने शासनाकडे पाठपुरावा करून घटनेने दिलेल्या हक्काची मागणी करीत आहे.
कोणाचाही कोणाशी वाद होण्याची आवश्यकताच नाही. कोणीच कोणाचे आरक्षण हिरावून घेऊ शकत नाही.मात्र शासनाकडे आपल्या आरक्षणाची बाजू मांडण्याऐवजी काही जातीवादी गुंड ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यां वर हल्ला करीत आहेत. माजलगाव जवळ पवन करवर यांच्यावरझालेला जीवघेणा हल्ला,याच जातीवादी गुंडांचे काम असून या गुंडांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी समता परिषदे च्या वतीने करण्यात आली आहे.